व्हर्च्युअल शाळेचे इ-विद्यार्थी
व्हर्च्युअल शाळेचे इ-विद्यार्थी कोरोनावर रुसा
हसा मुलांनो हसा ||
तुम्हा बोलवी गूगल मीटिंग
मित्रांशी करा तुम्ही चॅटिंग
झूम नि वेबेक्स – कॅमेऱ्यासमोर, खुशाल जाऊन बसा ||१ ||
धैर्य राखणे धर्म आपुला
विलग राहुनी मजा करूया
स्वयंशक्तीचा कौशल्यांचा, मनी उमटू दे ठसा ||२||
पँडॅमिकचा विसरा गुंता
लॉकडाऊनच्या नकोत चिंता
नव्या युगाची नवी धाडसे, तुम्ही घेतला वसा ||३||
उमाकांत काणेकरांच्या “प्रकाशतले तारे तुम्ही” कवितेवर आधारित बालकविता
रुचिरा महाजन:
Comments