छायाचित्र संदर्भ: http://divcomkonkan.gov.in/Document/ en/page/MapGallery.aspx कोकण म्हटलं की समुद्रकिनाऱ्याशी समांतर सह्याद्री पर्वतरांगेची गुंफण, त्यामुळे अनेक नागमोडी वळणांचे उंचसखल घाटरस्ते, नयनरम्य अशी हिरवी दाट झाडी व शेती हे दृश्य डोळ्यांसमोर येते. पहाटेचं धुकं, त्यामधून रास्ता कापणारी, माडा-झावळ्यांचा अडसर दूर करून पडणारी सूर्याची कोवळी किरणं, त्यामुळे उजळणारी लाल कौलारू घरं, आणि त्याबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळेची तान, काकड आरत्या आपल्या कानात फेर धरू लागतात. असा हा कोकण भाग म्हणजे या भूतलावरील स्वर्गच आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही या कोकण पट्ट्यातच आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. भारताला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा असणारी कोकण किनारपट्टी लाभली आहे. किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भागात असलेली ही कोकणपट्टी अपार निसर्गसौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या रांगा, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती यांनी कोकणाची जमीन संपन्न...
Comments