हरवले ते गवसले तेव्हा
‘हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?’ हे पी. सावळाराम यांनी लिहिलेलं आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं स्वतःशीच गुणगुणत मी गाडी चालवत घरी येत होतो. एखादी गोष्ट अनपेक्षितरित्या मिळाली तर त्याचा आनंद जास्त होतो. त्या आनंदाच्या तंद्रीतच मी घरी आलो. ‘लकी’ असणं म्हणजे काय, याचा अनुभव मी घेत होतो. घडलं असं की मी काही घरगुती सामान आणायला म्हणून कॉस्कोमध्ये गेलो होतो. गाडी लावताना लक्षात आलं की गाडीचं चाक पंक्चर झालेलं आहे. त्यामुळे ताबडतोब कॉस्कोमध्येच गाडी दुरुस्तीला टाकली आणि सामान घेऊन झाल्यावर गाडी मिळण्याची वाट बघत थांबलो. जेव्हा गाडी तयार झाली तेव्हा सामानाची कार्ट बाहेरच ठेवून किल्ली आणायला आतमध्ये गेलो. खरं म्हणजे अमेरिकेतले मेकॅनिक इथल्या गिऱ्हाईकांना आतमध्ये शॉप फ्लोअरवर घेऊन जात नाहीत, परंतु त्यावेळेच्या मेकॅनिकला माझी गाडी चालू करता आली नाही त्यामुळे त्याने मला आतमध्ये बोलवलं आणि गाडीच्या किल्ल्या तिथेच दिल्या. जी गोष्ट मेकॅनिकला करता आली नाही ती आपण रोज सहजरित्या करतो अशा वेगळ्याच खुमीमध्ये त्या मेकॅनिकसमोर मोठ्या आविर्भावात गाडी चालू करून मी त्या शॉप फ्लोर म...







Comments