Posts

Showing posts from October, 2020

संपादकीय

Image
गेल्या काही वर्षांत जग झपाट्याने बदलले. पत्र पाठवण्याचा काळ कधीच मागे पडला. केवळ घरी असताना फोनवर संभाषण हे देखील इतिहासजमा झाले. आता यत्र तत्र सर्वत्र सगळ्यांकडे फोन असतात आणि वाटेल तेव्हा वाटेल तिथून फोनवर बोलता येते.

पाठलाग

Image
निलेश मालवणकर बराच वेळ आम्हा दोघांपैकी कुणीही एकसुद्धा शब्द बोललं नाही. दोघंही शांत, चिडीचूप. पण मग मलाच राहवेना.

अकस्मात

Image
रोहित कोल्हटकर “अग मनिषला फोन केलास का?” गेल्या चार दिवसांत दहा वेळा तरी विभावरीने मनालीला हा प्रश्न केला असेल. मनिषला फोन केलास का? त्याचा काही फोन आला का? त्याची तब्येत कशी आहे? ह्या प्रश्नांचा तिने भडिमार केला होता, आणि मनिष मात्र गेले आठवडाभर फोनला उत्तर देत नव्हता. कोविड-१९च्या वातावरणात तशी काळजी वाटणं साहजिकच होतं म्हणा, परंतु मनालीला कॉलेजमध्ये असताना ह्याच मनिष नावाच्या मित्रापासून जरा दोन हात लांबच रहा, असं सांगणारी तिची आई विभावरी आज मात्र रात्रंदिवस मनालीकडे त्याची विचारपूस करीत होती.  भारतातून अमेरिकेला यायच्या प्रवासात मनिषने विभावरीला खूप मदत केली होती म्हणूनच असेल कदाचित. तसा भारत अमेरिका हा प्रवास विभावरीच्या अंगवळणी पडला होता. मोठा मुलगा संजय, मधली हिमानी आणि आता गेल्या २ वर्षांपासून धाकटी मनाली अशी तिन्ही मुलं अमेरिकेत असल्यामुळे तिच्या नवऱ्याबरोबर ३-४ वाऱ्या, त्यानंतर एकटीच्या २-३ वाऱ्या अशा बऱ्याच वाऱ्या झाल्या होत्या. नागपूरवरून निघायचं, एक रात्र मुंबईला मुक्काम करायचा, युरोपमध्ये कुठेतरी ब्रेक आणि शेवटी अमेरिका गाठायची, हा प्रोटोकॉल ठरलेला होता. पण कोविड-१९च्

रघु

Image
श्री. बाळकृष्ण पाडळकर दहिगाव तसं शांत गाव. अजगरासारखं सुस्त,हालचाल न करणारं. परंतु दहिगावात राहणारी एक एक व्यक्ती म्हणजे कमालीची बिलंदर. सरळ चालणाऱ्याला सरळ चालू न देणारी आणि वाकड्याला अजून कसं वाकडं चालवता येईल, या फिकरीत असणारी व्यक्ती हमखास दहिगावची आहे म्हणून समजावी. आता रघुनाथचंच पहा ना! रघुनाथ माहीत नाही अशी व्यक्ती दहिगावतच काय दहिगावच्या पंचक्रोशीत सापडणं मुश्किल. त्याला पुरुषच नाही तर बायासुद्धा चांगलं ओळखून असत कारण त्याचे कारनामेच एवढे भारी असत की सगळ्यांनाच त्याची नोंद घ्यावी लागे. रघुनाथ तसा काही फार शिकलेला नव्हता पण त्याच्या शिक्षणाच्या मानाने त्याचा मेंदू फार भारी होता. चाणाक्ष माणसाला ज्या कल्पना सुचत नाहीत त्या रघुनाथ लीलया अंमलात आणत असे. उंच अंगकाठी असलेला रघुनाथ बऱ्याच दिवसांचा उपाशी असल्यासारखा वाटे कारण त्याच्या अंगावर मांसाचा कुठे पत्ताच नव्हता. अंगात पांढरी लांब विजार, पांढऱ्या रंगाचा सदरा अन् डोक्यावर गांधी टोपी या पेहेरावामुळे तरी त्याची फक्त हाडं असलेली शरीरयष्टी थोडी बरी दिसे. अंगातला अंगरखा काढल्यास डोक्यापासून पायापर्यंतची हाडे सहज मोजता यावी असा त्याचा

मी पाहिलेला हिमालय

Image
श्रीमती चित्रा धाकड “हिमालयावरूनी वाहत असे ती धन्या,  म्हणे ही आल्यावरती पुरती हिमाद्री कन्या || बाजूला खडक असोनी उंच भारी,  वाहे त्यामधुनी ती देवी शुद्ध नारी ||” इ.स.१९७० च्या दशकात माझे आजोबा या पंक्ती गुणगुणत असत व मला ते खूप आवडायचे. आजोबा मुख्याध्यापक असल्याचा आम्हाला अभिमान होता. मी तेव्हा ८-९ वर्षांची असेन, माझा हात धरून शाळेत नेणे व ऊन लागू नये म्हणून डोक्यावर छत्री धरणे अशी खूप काळजी ते घ्यायचे. अशा आजोबांची नात आजोबांचा वारसा का म्हणून नाही पुढे नेणार? त्यांच्यामुळेच ही प्रेरणा मला मिळत आहे. लेखणी जरी माझ्या हातात असली तरी विचार त्यांचे आहेत. त्यांच्या विचारांशिवाय माझे लेखन निरस वाटेल, लेखनाला ओलावाच राहणार नाही. त्यांच्या विचाराने मला स्फूर्ती येते. माझ्या नकळत जे विचार डोक्यात येतात, ते या लेखणीद्वारे प्रकट होतात अशा आजोबांना मी नमस्कार करते व असेच प्रेमळ आजी-आजोबा सगळ्यांना लाभो हीच प्रार्थना देवाला करते.  मी भाग्यवान आहे कारण सानेगुरूजींची कर्मभूमी असलेल्या अंमळनेर तालुक्यात मी जन्मले व लहानाची मोठी झाले, शिक्षण घेतले. तिथल्या प्रत्येक गोष्टींना विचारांचा, प्रेमाचा सु

वैकुंठ

Image
(अनुवादित कथा) मूळ लेखक: रवि कोप्परपु अनुवाद: वरदा वैद्य डॉ. रवि कोप्परपु यांनी लिहिलेल्या “वैकुंठम” ह्या मूळ तेलुगू कथेच्या त्यांनीच केलेल्या इंग्रजी अनुवादावरून हा मराठी अनुवाद केला आहे. मूळ तेलुगू कथा प्रतिलिपी संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. ही कथा ‘मैत्र’च्या ऑक्टोबर २०१९ अंकात प्रकाशित झालेल्या ‘पाताळ’ ह्या कथेचा पुढचा भाग आहे. पाताळ कथा कृपया इथे वाचावी -  ‘मैत्र’ ऑक्टोबर २०१९ चंद्रयान-१ हा भारताने चंद्रावर पाठवलेला पहिला उपग्रह. २००८ च्या ऑक्टोबरात इस्रोने हा उपग्रह चंद्राच्या पृष्ठभागाची चाचणी करण्याकरता पाठवला. मात्र २००९ च्या ऑगस्ट महिन्यात तो बंद पडून काम करेनासा झाला. घातक प्रारणांपासून उपग्रहाचे रक्षण व्हावे म्हणून त्यावर संरक्षक कवच चढवलेले होते. हे कवच निकामी झाल्यामुळे हा उपग्रह वेळेआधीच नादुरुस्त झाला. अंतराळात कोणकोणत्या प्रारणांशी उपग्रहाची टक्कर होऊ शकते हे लक्षात घेऊन खरे तर हे कवच तयार केले होते. तरीही हे संरक्षक कवच निकामी का झाले असावे हा प्रश्न काही काळ अनुत्तरित राहिला. ह्या उपग्रहांसाठीच्या इस्रोने गोळा केलेल्या दूरमिती (टेलिमेट्री) नोंदींचा अभ्यास करत

एका बागेची गोष्ट

Image
आरती - राणे वाळवेकर शब्दांकन: अभिजित वाळवेकर   असे पाहुणे येती ... तुम्ही म्हणाल की बागेच्या गोष्टी मध्ये पाहुणे कुठून आले? आणि ते पण कोरोनाच्या काळात? आता तर पाहुणे अजिबातच अपेक्षित नाहीत. घराची बेल वाजली तर घाबरायला होतं. कोण आलं असेल? आणि का बरं आलं असेल? जे कोणी आलं असेल त्यांनी मास्क घातला असेल का?आणि अगदी अशा संभ्रमात आमच्याकडे एक पाहुणा आला. तर त्याचं असं झालं की शुक्रवार संध्याकाळ होती. सकाळपासून मी आणि माझा नवरा अभिजित दोघेही ऑफिसच्या कामात व्यग्र होतो. मुलं नेहमीप्रमाणे युट्युब मध्ये व्यग्र होती. मी अभिजितला अंगणातलं गवत कापायची आठवण करून दिली. नेहमीप्रमाणे कामं उद्यावर टाकणाऱ्या नवऱ्याने होकार देताच मला पण बरं वाटलं. अभिजित बाहेर गेला आणि थोड्या वेळात मला त्याची हाक ऐकू आली. तो मला आणि मुलांना बोलवत होता, जरा घाईतच बोलावत होता. आम्ही सगळेजण बाहेर आलो आणि बघतो तर काय, आमच्या अंगणात साधारण थाळीच्या आकाराचं, पिवळं आणि तपकिरी रंगाचे एक इवलुसं कासव आलं होतं . छानशी नक्षी होती त्याच्या टणक पाठीवर. चौकोनी नक्षी आणि प्रत्येक चौकोनात अजून छानशी नक्षी. जणू काही कोणीतरी कोरीव काम केल

स्वप्ना औटे यांनी काढलेली छायाचित्रे

Image
स्वप्ना औटे छायाचित्रकार

अमेरिकन व्हिसाचे अनुभव

Image
डॉ. गजानन सबनीस सध्याच्या काळात अमेरिकेत राहाण्यासाठी लागणारे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी खटपटी लटपटी पुष्कळच चालू आहेत. मग काही जण नाते दाखवून/शोधून व्हिसा मिळवण्याच्या मागे असतात, तर काही अमेरिकन नागरिकाशी लग्न करून. हा प्रयत्न काही नवीन नाही, कारण गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यावेळेस भारतीय समाज आणि त्यातून मराठी समाज खूपच लहान होता त्यामुळे व्हिसा प्रकरण पटकन संपूनपण जायचे. अमेरिकन व्हिसाबद्दलचा इतिहास पुष्कळांना माहीत व्हावा म्हणून आणि व्हिसा प्रक्रियेतून गेलेल्या आमच्यासारख्या इतर लोकांच्या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून हा लेख लिहिण्याचा उहापोह केला आहे. अमेरिकन व्हिसाबद्दल लिहायचे तर पुष्कळच लिहिता येण्यासारखे आहे. प्रत्येकाचा अनुभव त्या त्या परीने वेगळा आहे. असे अनुभव आणि विचार लिहून काढले तर एक छानशी मालिका तयार होईल आणि हे अनुभव वाचून वाचकांना पण त्याबद्दल पुष्कळ माहिती मिळेल असा एक विचार डोक्यात आला. हा विचार जवळच्या मित्रमंडळींकडे मांडला त्यांनापण आवडला. तेव्हा आम्ही असे ठरवले की मी माझा अनुभव थोडक्यात सांगून सुरुवात करावी आणि पुढच्या तीन

कलाकार ओळख - सौ. योगिनी (स्नेहा) दहिवदकर

Image
सौ. योगिनी (स्नेहा) दहिवदकर बाल्टिमोर परिसरांत राहणाऱ्या मराठी समाजामध्ये चित्रकारी, लेखन, अभिनय, हस्तकला, गायन, वादन आणि इतर अनेक कलाक्षेत्रांमध्ये वावर असणारे अनेक गुणी कलाकार आहेत. ह्या अंकामध्ये चित्रकारी करणाऱ्या योगिनी दहिवदकरची एक कलाकार म्हणून ओळख करून घेऊ. दर अंकातून एक वा दोन कलाकारांची ओळख करून देणारचा मानस आहे. तुमच्यातील कलागुण लोकांसमोर आणण्याची ही संधी तुम्ही घेऊ इच्छित असाल तर आम्हाला Editor@BaltimoreMarathiMandal.org ह्या पत्त्यावर संपर्क करा. ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ तत्वावर कलाकारांची माहिती पुढील अंकांमध्ये प्रसिद्ध होईल. Blessings! – May heavenly light bless upon you & may your life be full of colors and fragrance. ‘मैत्र’च्या मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार! तुम्हा सर्वांना ह्या अंकाच्या मुखपृष्ठावरील जलरंगातील चित्र ‘Blessings!’ आवडले असेल अशी आशा करते. तुम्हा सर्वांना दसरा आणि दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! चित्राच्या शीर्षकाप्रमाणेच तुम्हा सर्वांवर परमेश्वराची कृपा असावी हीच सदिच्छा. माझ्या पेंटिंगची सुरुवात म्हटले तर लहानपणी काकूच्या हातच्या रा

बालविभाग

Image
अपर्णा वाईकर खाली दिलेली चित्रे ओळखून दिलेल्या यादीतून त्यांची नावे त्या चित्राखाली लिहा. आकाशकंदील, पणती, रांगोळी, दिवाळी-किल्ला, चकली, लाडू, चिवडा, फुलबाज्या, कडबोळी , शेव, करंजी, शंकरपाळी